Close

नैसर्गिक आपत्ती विभाग

विभागांतर्गत कामे

शेतकरी आत्महत्या कार्यसुची

 • जिल्हयातील शेतकरी आत्महत्या प्रकरणी प्राथमिक अहवाल वरिष्ठ कार्यालयांस सादर करणे.
 • तालुकानिहाय प्राप्त प्रस्तावाची छाननी करुन जिल्हास्तरीय समितीची बैठक आयोजित करुन सभेचे कार्यवृत्त तयार करणे.
 • पात्र /अपात्रतेचे निर्णयाकरिता प्रस्ताव जिल्हास्तरीय समितीसमक्ष सादर करणे.
 • शेतकरी आत्महत्या पात्र ठरविलेल्या प्रकरणात शासन निकषानुसार 30% आर्थीक सहाय्य अनुदान धनादेशाद्वारे वारसांना वितरीत करणे
 • उर्वरित 70% रक्कम वारसाचे नावे एम .आय.एस खात्यात जमा करणे.
 • तालुकानिहाय अनुदान वितरीत करणे
 • जिल्हातील तालुकानिहाय पात्र/अपात्रतेची माहिती विहीत भरुन अदययावत ठेवणे.
 • एम.आय.एस खात्याची मुदत संपल्यानंतर रक्कम काढण्याची परवानगी देणे.
 • एम.आय.एस खात्यातील मुदतपुर्व रक्कम काढण्यासाठी शासन निकषानुसार कार्यवाही करणे.
 • धनादेशाची मुदत संपणे, नावात बदल इ.बाबतीत कार्यवाही करणे.
 • शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी भू-सेवाधारी सेवासंकल्प अभियान राबविणे.
 • शेतकरी आत्महत्या बाबतची माहिती गुगल – ड्राईव्हर अदययावत करणे
 • विविध प्रकारच्या होणा-या सभा /बैठकांना माहिती पुरविणे.
 • शेतकरी आत्महत्या प्रकरणी कपात सुचना, तारांकित /अतारांकित प्रश्न तसेच लक्षवेधी सुचना, तक्रार व माहिती अधिकार इ.बाबत नस्ती हाताळणे
 • वरिष्ठांनी निर्देशानुसार कार्यवाही करणे.

अ.का. पर्जन्यमान

कार्यसुची

 • माहे जुन ते ऑक्टोंबर या कालावधीत दैनंदिन पर्जन्यमान्याची आकडेवारी संकलीत करुन शासनास अहवाल सादर करणे.
 • दैनंदिन पर्जन्यमानाची आकडेवारी महारेन या शासनाच्या वेबसाईटवर माहे जुन ते ऑक्टोंबर या कालावधीत ऑनलाईन अपडेट करणे.
 • माहे जुन ते ऑक्टोंबर या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या जिवीत व वित्तहानीबाबत शासनास अहवाल सादर करणे.
 • मुख्यलेखाशिर्ष 224520155, 22450217, 22450271, 22450244 व 22450315 अंतर्गत शासनाकडून प्राप्त अनुदान तहसिल कार्यालयांना वाटपाबाबतची कार्यवाही करणे.
 • मुख्यलेखाशिर्ष 224520155, 22450217, 22450271, 22450244 व 22450315 अंतर्गत शासनाकडून प्राप्त अनुदानाच्या अनुषंगाने ऑनलाईन ताळमेळ घेणे व शासनास सादर करणे.
 • मुख्यलेखाशिर्ष 224520155, 22450217, 22450271, 22450244 व 22450315 अंतर्गत शासनाकडून प्राप्त अनुदानाच्या अनुषंगाने वित्तीय वर्षनिहाय विनियोजन लेखे शासनास सादर करणे.
 • मुख्यलेखाशिर्ष 224520155, 22450217, 22450271, 22450244 व 22450315 अंतर्गत शासनाकडून प्राप्त अनुदानाच्या खर्चाचे उपयोगीता प्रमाणपत्र शासनास सादर करणे.
 • वरिष्ठ अधिकारी यांनी वेळोवेळी सांगितलेली कामे करणे.

अ.का. अनुदान

कार्यसुची

 1. विविध नैसर्गिक आपत्ती अंतर्गत बाधीतांना नुकसान भरपाई देण्यासाठी अनुदानाची मागणी शासनास सादर करणे.
 2. मुख्यलेखाशिर्ष 22452434 व 22452452 अंतर्गत प्राप्त निधीच्या संबंधीची कामे….
  1. प्राप्त निधीच्या खर्चाची उपयोगीता प्रमाणपत्रे शासनास सादर करणे.
  2. महालेखाकार, नागपूर यांचेकडील खर्चाशी ऑनलाईन ताळमेळ घेणे व त्यांचा अहवाल शासनास सादर करणे.
  3. तहसिल कार्यालयांना शासनाकडून प्राप्त अनुदान वितरीत करण्याची कार्यवाही.
  4. वित्तीय वर्षनिहाय प्राप्त अनुदानाच्या खर्चाचे विनियोजन लेखे शासनास सादर करणे.
 3. मा.मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून अर्थसहाय्यबाबतची प्रस्तावासंबंधीची कामे…..
  1. प्राप्त प्रस्तावाच्या अनुषंगाने सविस्तर माहिती तहसिलदार कार्यालयाकडून प्राप्त करणे.
  2. परिपूर्ण प्रस्ताव शासनास सादर करणे.
  3. मा.मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून प्राप्त मदतीचे आपद्ग्रस्तांना वितरण करणे.
 4. पिक विमा योजनाबाबतची कामे………
  1. पिक विमा संबंधी आवश्यक अनुदानाची मागणी शासनास सादर करणे.
  2. शासनाकडून प्राप्त पिक विमा अनुदानाचे तहसिल कार्यालयांना वाटप करणे.
  3. पिक विम्याबाबत प्राप्त होणाऱ्या तक्रारीच्या अनुषंगाने कार्यवाही करणे.
 5. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गतची कामे………….
  1. अर्जदारांकडून अर्ज स्विकारणे.
  2. माहिती उपलब्ध असल्यास संबंधीतांना उपलब्ध करुन देणे.
  3. माहिती उपलब्ध नसल्यास किंवा इतर कार्यालयाशी संबंधीत असल्यास अर्ज संबंधीत कार्यालयाकडे हस्तांतर करणे.
 6. आपले सरकार पोर्टलवर प्राप्त ऑनलाईन तक्रारीचे निवारणासंबंधीची कामे……
  1. तक्रारीच्या अनुषंगाने माहिती उपलब्ध असल्यास संबंधीतांस माहिती उपलब्ध करुन देणे.
  2. इतर विभागाशी संबंधीत असल्यास तक्रार संबंधीत विभागांना पाठविणे.
  3. तक्रारीच्या अनुषंगाने शासनास सादर करणे व तक्रादारांस कळविणे.
 7. पिक कर्ज मंजूरी / पिक कर्ज पुनर्गठणासंबंधीची कामे…………
  1. बँकेशी संबंधीत पिक कर्ज मंजूरी व पिककर्ज पुनर्गठनाची निवेदने / तक्रारी जिल्हा अग्रणी बँकेला पाठविणे.
  2. कृषी विभागाशी संबंधीत तक्रारी / निवेदन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, बुलढाणा यांचे कार्यालयांना सादर करणे.