बंद

लोणार सरोवर

दिशा
  • लोणार सरोवर
  • लोणार सरोवर चे दृश्य
  • लोणार सरोवर चे क्षेत्रीय दृश्य
  • लोणार सरोवर, लोणार चे छायाचित्र
  • लोणार सरोवर, लोणार येथील दृश्याचे छायाचित्र
  • लोणार सरोवर, लोणार येथील क्षेत्रीय दृश्याचे छायाचित्र

लोणारचे सरोवर महाराष्ट्र राज्यामधील बुलढाणा जिल्ह्यातले खाऱ्या पाण्याचे एक सरोवर आहे.याची निर्मिती एका उल्कापातामुळे झाली.लोणार हे बेसॉल्ट खडकातील एकमेव मोठे आघाती विवर आहे. याचे पाणी अल्कधर्मी आहे. लोणार सरोवराच्या जतनासाठी व संवर्धनासाठी लोणार विवर हे वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केले आहे. या परिसरात अंदाजे बाराशे वर्षांपूर्वीची मंदिरे आहेत. त्यातील १५ मंदिरे विवरातच आहेत. सरोवराची निर्मिती ५२,००० ± ६००० वर्षांपूर्वी झाली असे मानले जाते. पण २०१० साली प्रकाशित झालेल्या एका शोधनिबंधात सरोवराचे वय ५,७०,००० ± ४७,००० वर्ष इतके वर्तवण्यात आले आहे. अमेरिकेतील स्मिथसोनिअन संस्था, युनायटेड स्टेट्स जिओग्राफिकल सर्व्हे तसेच भारतातील जिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया, फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी यासारख्या संस्थांनी या सरोवरावर बरेच संशोधन केले आहे.

कसे पोहोचाल?:

विमानाने

औरंगाबाद येथिल विमानतळ 140 किमी अंतरावर आहे.

रेल्वेने

सर्वात जवळचे रेल्वे स्थानक परतूर आणि जालना आहेत.

रस्त्याने

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस स्टेशनमधून नियमित राज्य परिवहन बस उपलब्ध आहेत.