स्थानिक निधी विभाग
शाखेची माहिती :-
जनगणना :जनगणना हे एक राष्ट्रीय महत्वाचे कार्य असुन जनगणनेचे मुख्य वैशिष्टय म्हणजे जनगणनेच्या ठरावीक कालावधीत देशातील सर्व व्यक्तींची गणना करणे आणि गणना करत असतांना कुठल्याही व्यक्तीला न वगळता तसेच कुठल्याही व्यक्तीची पुन्हा गणना होणार नाही याची काळजी घ्यावी लागते.
जनगणना ही शासन स्तरावर निर्देशित झाल्यानंतर तहसिल कार्यालय अंतर्गत कर्मचा-यांचे प्रशिक्षण घेतले जाते. शासनाकडुन वेळोवेळी निर्गमित होणा-या अधिसुचनेनुसार तहसिल कार्यालयातील व नगर पालिका कार्यालयातील संबंधित नस्ती हाताळणारे लिपीक यांच्यामध्ये समन्वय साधला जातो. शासन स्तरावरुन वेळोवेळी निर्गमित झालेले शासन निर्णय व अधिसुचनेनुसार जनगणनेची कामे केली जातात
राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्यावतीकरण :राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अदयावतीकरण करण्यासाठी विहीत पुस्तकामधुन माहितीची नोंदणी करण्याचे काम राज्य शासनामार्फत निर्गमित झालेल्या शासन निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाचे स्तरावरुन पुर्ण करण्यात आले असुन सदर एन.पी.आर.पुस्तकामधील माहीती संगणक प्रणालीमध्ये करण्यात आलेली आहे.
शासकीय निवासस्थान :जिल्हयातील सर्व अधिकारी / कर्मचारी यांना शासकीय निवासस्थान मिळण्यासाठी संबंधितांकडुन आलेले विनंती अर्ज कार्यवाही करण्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभाग, बुलढाणा यांना पाठविण्यात येतात.
अल्पबचत निवासस्थान :जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी यांना शासकीय निवासस्थान मिळण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयाचे स्तरावरुन नियमानुसार आदेश केले जातात.
महिला लैगिक छळाबाबत :कामाचे ठीकाणी महिलांचे होणा-या लैगिक छळापासुन प्रतिबंध करण्यासाठी महिलांच्या होणा-या लैगिक छळापासुन संरक्षण(प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम 2013 व नियम दिनांक 9 डीसेंबर 2013 रोजी प्रसिध्द करण्यात आला आहे. सदर अधिनियमातील कलम 6(1) नुसार ज्या कार्यालयात 10 पेक्षा कमी कर्मचारी आहेत किंवा जेथे नियुक्ती प्राधिका-याच्या विरुध्द तक्रारी आहेत अशा तक्रारीसाठी जिल्हा स्तरावर स्थानिक तक्रार समिती गठीत करण्याबाबत दि.11/9/2014 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे.
राष्ट्रीय सन :शासन स्तरावर वेळोवेळी निर्गमित होणा-या निर्देशानुसार 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन, 1 मे महाराष्ट्र राज्य वर्धापन दिन तसेच स्वातंत्र दिनाचा वर्धापन दिन 15 ऑगष्ट साजरे केले जातात. सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता या कार्यालयाचे स्तरावरुन ध्वजारोहणाचा कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकाची छपाई करुन लोकप्रतिनिधी यांना निमंत्रण पत्रिका वाटप केल्या जातात.
समन्वय समिती :जिल्हा समन्वय समिती सभा दर महिन्याच्या पहील्या सोमवारी मा.जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात येते. सदर सभेमध्ये सर्व विभागातील नविन विषयावर चर्चा केली जाते.