बंद

रोजगार हमी योजना विभाग

विभागाविषयी

शाखेचे नावं :- रोजगार हमी योजना विभाग

शाखेची माहिती :- महात्‍मा गांधी राष्‍ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत कामे उपलब्‍ध करुन देणे, 50 कोटी वृक्ष लागवड योजना, जलयुक्‍त शिवार अभियान, जलपुर्ती धडक सिंचन विहिर योजना व नरेगा सिंचन विहिर योजना, नदी पुनरुज्‍जीवन ई. योजना राबविल्‍या जातात

विभागांतर्गत कामे

  1. महात्‍मा गांधी राष्‍ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत यंत्राणा व ग्रामपंचायत यांचे मार्फत विविध प्रकारच्‍या योजना राबवून कामे उपलब्‍ध करुन दिल्‍या जातात
  2. 50 कोटी वृक्ष लागवड योजने अंतर्गत दरवर्षी मोठ्या प्रमाणवर वृक्ष लागवड केली जाते जलपुर्ती धडक सिंचन विहिर योजना व नरेगा सिंचन विहिर योजने अंतर्गत अल्‍प भुधारक व सिमांत शेतकरी यांना सिंचन विहिरीसाठी यंत्राणेमार्फत अनुदान अनुदान उपलब्‍ध करुन देण्‍यात येते
  3. जलयुक्‍त शिवार अभियाना अंतर्गत नाला सरळीकरण, नदी खोलीकरण, शेततळे इ. कामे जिल्‍हा स्‍तरीय विविध यंत्रणेकडुनसिंचन क्षेत्र वाढविण्‍यासाठी आवश्‍यक कामे केली जातात
  4. वैयक्‍तीक फळबाग लावगड योजने अंतर्गत कृषि विभागामार्फत फळबाग लागवड केली जाते
  5. नदी पुनरुज्‍जीवन, नाला सरळीकरण इ कामांना प्रशासकिय मान्‍यता प्रदान करण्‍यात येते
  6. मगांराग्रारोहयो अंतर्गत लेखापरिक्षक यांचे मार्फत झालेल्‍या खर्चाचे लेखापरीक्षण करण्‍यात येते
  7. मगांराग्रारोहयो अंतर्गत संकेतस्‍थळावर नोंदविण्‍यात आलेल्‍या अहवालावरुन बैठकीमध्‍ये आढावा घेण्‍यात यातो
  8. मगांराग्रारोहयो अंतर्गत जिल्‍हा स्‍तरावरील अधिकारी व कर्मचारी व तालुकास्‍तरीय अका (रोहयो) असे एकुण 23 कर्मचारी यांचे आस्‍थापना विषयक सर्व प्रकारची कार्यवाही (उदा वेतन व भत्‍ते, मुळ सेवापुस्‍तक इ) या विभागातुन करण्‍यात येते
  9. मगांराग्रारोहयो अंतर्गत च्‍या सर्व बांबीवर ऑनलाईन पध्‍दतीने नियंत्रण ठेवण्‍यात येते
  10. नरेगा अंतर्गत कंत्राटी कर्मचारी यांची सेतु समितीमार्फत नियुक्‍ती करण्‍यात येते व सदर कंत्राटी कर्मचारी यांना दरमहा मानधन सेतु समिती मार्फत अदा करण्‍यात येते
  11. रोजगार हमी योजना समितीच्‍या जिल्‍हा बैठकीबाबतची सर्व कामे केली जातात
  12. मगांराग्रारोहयो अंतर्गत सर्व जिल्‍हास्‍तरीय कार्यान्‍वयीन यंत्रणा/ग्रामपंचायत यांचा नियमितपणे आढावा घेवून तातडीने कामे पुर्ण करण्‍यासाठी निर्देश देण्‍यात येतात.