आपत्ती व्यवस्थापन
विभागांतर्गत कामे
- जिल्हाधिकारी कार्यालयातील नैसर्गीक आपत्ती नियंत्रण कक्ष ३६५ दिवस २४ तास कार्यन्वीत ठेवण्यात येतो
- नैसर्गीक आपत्ती नियंत्रण कक्षात जिल्हयाच्या ठिकाणी असलेले कार्यालयाचे कर्मचाऱ्यांची नियुक्ती दर सहा महिन्यानी करण्यात येते
- तालुका स्तरावरील नियंत्रण कक्षावर नियंत्रण ठेऊन आपत्ती विषयक माहिती घेणे
- आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करणे व त्याचे अद्यावतीकरण, विचार विनीमय कार्यशाळांचे आयोजन करणे, आराखडयांची व्यवहार्यता तपासणे, रंगीत तालीम घेणे आपत्ती व्यवस्थापना संबधी तहसिलचे तसेच इतर विभागाचे आराखडे तयार करणे
- यात्रा व्यवस्थापन आराखडा तयार करणे
- संस्थात्मक मजबूती करणे – जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे मजबूतीकरण व पूर्वतयारी संबधात शासकीय संस्थाचे बोट क्लब, HAM गट इत्यादी संस्थाची सज्जता आपत्ती व्यवस्थापनाशी निगडीत अशासकीय संस्थाचे प्रशिक्षण, सामाजिककार्य, महाविद्यालय, इस्पितळांची सज्जता, जिल्हा आपतकालीन कार्य केंद्रांची सज्जता
- प्रशिक्षण व सक्षमिकरण – प्रशासन, अभियंते, वास्तुविशारद, डॉक्टर्स, विद्यार्थी व शिक्षक, प्रसार माध्यमे, उद्योग जगत, यांचे प्रशिक्षण व सक्षमिकरण
- जनजागृती कार्यक्रम – आपत्ती व्यवस्थापन विक्षयक चित्रफिती , रेडीओ जिंगल्स, रोड शो, लोकगीते, पथनाटय, भिंती पत्रक, पोष्टर्स, निबंध स्पर्धा जिहीराती फलक इत्यादी मधुन जनजागृती करणे
- आपत्ती व्यवस्थापना संबधी माहीती पुस्तीका तयार करणे, मार्गदर्शक तत्वे, प्रमाणीत कार्यपध्दती तयार करणे
- तालुका स्तरावर व जिल्हास्तरावर शोध व बचाव पथक तयार करणे
- पूर परिस्थितीत उपयोगात आणावयाची सामुग्रीची वेळोवेळी तपासणी व देखभाल करणे
- ग्रामपातळीवर पूरनियंत्रण समित्यांची स्थापना करणे
- अतिवृष्टी / वादळ / गारपीट / उन्हाळयामधील वाढते तापमान या बाबत वेधशाळेकडून आलेल्या इशाऱ्याची माहिती जिल्हयातील तालुक्यांना देणे
- उष्ण लहरी / उष्माघाता बाबत जिल्हा आरोग्य यंत्रणेशी समन्वय ठेवणे
- पुर / आग / वादळ अशा प्रकारच्या इतरही आपत्ती मध्ये मदत देणे