भूसंपादन (लसिकामे)
शाखेचे नांव: उपजिल्हाधिकारी भुसंपादन (लसिकामे) बुलढाणा
शाखेची माहिती: भुसंपादन विषयक सर्व कामे
शाखा / विभागात अंतर्गत करण्यात येणा-या कामाचा तपशिल:
भुमी संपादन पुनर्वसन व पुनर्वासात करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम 2013 अनुसार मा. जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये प्राप्त झालेले भुसंपादन प्रकरणांमध्ये 2013 च्या अधिनियमानुसार प्रथमतहा कलम 11 नुसार प्रारंभिक अधिसुचना प्रसिध्द करुन त्यावर 60 दिवसाच्या आत कास्तकारांचे आक्षेप बोलविणे प्राप्त झालेल्या आक्षेपानुसार संबंधित कास्तकारांना नोटीस देवून कलम 15 ची कार्यवाही पुर्तता करुन प्रकरण कलम 19 च्या मान्यतेकरीता मा. जिल्हाधिकारी यांचेकडे सादर करणे तदनंतर प्रकरणात जमिनीच्या निगडीत असलेल्या सर्व बाबींचे मुल्यांकन प्राप्त करुन घेणे मुल्यांकन प्राप्त झाल्यानंतर संबंधित भुसंपादन प्रकरणात प्रारुप व अंतिम निवाडा तयार करुन मंजुरी प्रदान झाल्यानंतर संबंधित कास्तकारांना त्यांच्या संपादित जमिनीचा त्यांच्या तहसिल कार्यालयाच्या ठिकाणी मोहिम राबवून मोबदला अदा करुन त्यांना त्या स्थळी भुसंपादन प्रमाणपत्रे सुध्दा देण्यात येतात तसेच अधिनियमानुसार वाढीव मोबदल्याच्या कलम 64 नुसार अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्यावर कार्यवाही करुन मोबदला वाटप करण्यात येते.