बंद

धार्मिक स्थळे

“श्री” गजानन महाराजांचे समाधी मंदिर मध्यभागी असून परिसराच्या ‘ उत्तर व पश्चिम ‘ दिशेस दोन भव्य प्रवेशव्दारे आहेत.
अवघ्या ३२ वर्षांच्या अवतारकार्याव्दारे आध्यात्मिक जगतात अढळ स्थान निर्माण करणाऱ्या संत सत्पुरुष “श्री” नी १९०८ साली, त्यांच्या अवतार समाप्तीचे संकेत देताना ” या जागी राहील रे ” असे सांगत ज्या ठिकाणी निर्देश केला त्याच जागेवर आज “श्री” चे भव्य समाधी मंदिर उभारण्यात आले आहे. “श्री” च्या समक्ष व संमतीने निर्माण झालेल्या या समाधी मंदिराच्या भुयारात जिथे श्री. हरी पाटलांनी शिला ठेवली होती तिथे “श्री” ची संजीवन काया “समाधिस्थ” आहे.

पंढरपूर हे संतांचे माहेर घर, तर शेगांव हे भक्तांचे !

संतांजवळ सर्व जातीपंथाचे भक्त अमन शांती मिळावी म्हणून जातात. गुरू हे तत्व आहे, पवित्र जीवन ते संत. श्रध्दा व भावाची दृढता ते भक्त. “श्रीं” चे समाधी मंदिर अत्यंत आकर्षक अशा संगमरवरी बांधणीतून घडविलेले असून थेट दर्शन तसेच श्री मुखदर्शनाव्दारे भक्तजनांना आपल्या आराध्य दैवताचे अलौकिक रूप पाहता येते. गाभाऱ्यासमोरील प्रशस्त, मोकळ्या जागेतून श्री गजानन महाराजांचे ‘डोळा भरून‘ दर्शन घेता येते. समाधी मंदिराच्या बाहेरील बाजूस नानाविध देवीदेवतांची अप्रतिम शिल्पे कोरण्यात आली आहेत.

श्रीराम मंदिर

“श्रीं” चे दर्शन घेऊन भुयारातून भक्त श्रीराम मंदिरात प्रवेश करतात, अशी रचना करण्यामागे एक विशिष्ट हेतू आहे; संतांकडे गेल्यावर संत भक्तांना देवापर्यंत पोहोचण्याचा मार्ग दाखवितात. म्हणून महाराजांचे दर्शन घेऊन भुयारातून बाहेर पडल्यावर श्री गजानन महाराज संजीवन समाधी स्थानाच्या वरील बाजूस सुवर्णमयी प्रभावळीतून साकारलेल्या श्रीराम मंदिरात प्रभू रामचंद्र, सीतामाई व लक्ष्मण यांच्या संगमरवरी आकर्षक व विलोभनीय मूर्तीचे दर्शन होते. या मंदिराचे प्रवेशव्दार तसेच गाभाऱ्यातील काही भाग सुवर्णपत्र्याने मढविलेला आहे. येथेच श्रींच्या नित्य वापरातील पादुका तसेच चांदीचे मुखवटेही आहेत. हे चांदीचे मुखवटे श्रींच्या पालखी सोहळयामध्ये भक्तदर्शनार्थ ठेवले जातात.

सभामंडप

श्रींच्या समाधीचे दर्शन घेऊन, पायऱ्या चढून वर येताच पाषाणातून कोरलेल्या कलाकुसरयुक्त नक्षीदार कमानी आणि डौलदार खांबांवर साकारलेल्या भव्य सभामंडपात श्री गजानन विजय ग्रंथातातील श्रींचे विविध लीला प्रसंग चित्ररूपाने साकारलेले दिसतात.पूर्वीच्या दगडाच्या खांबावर रंग चढवल्याने त्या अधिक आकर्षक दिसतात. याच सभामंडपात श्रीराम मंदिर तसेच दासमारुतीचे छोटे परंतु आकर्षक मंदिर दृष्टीस पडते.

बुलढाणा येथील राजूरघाटाच्या निसर्गरम्य परिसरात व्यंकटगिरी बालाजी चे भव्य मंदिर आहे.

तिरूमला येथील बालाजीची प्रतिकृती या ठिकाणी साकारण्यात आली असून परिसरात डोंगर आहेत.

व्यंकटगिरी राजूरघाट परिसरातील बालाजी मंदिराच्या प्रांगणात हनुमानजीची २१ फूट उंच मूर्ती आहे.

बुलढाणा येथील राजूरघाटाच्या निसर्गरम्य परिसरात धम्म गिरी, बुलढाणा आहे.

मेहकर तालुका हा अजिंठा पर्वतरांगामध्ये स्थित आहे. शहराजवळील पैनगंगा नदी वाहते. मेहकर येथे भगवान शारंगधर बालाजीचे मंदिर 120 वर्षांहून जुने आहे. बालाजींच्या शिल्प सोबत सापडलेल्या तांबे, पितळ, सोने या धातूंत कोरलेले शिलालेख व जडजवाहीर आता ब्रिटीश संग्रहालय, इंग्लंडमध्ये आहेत. हे आशियातील भगवान बालाजीचे सर्वात मोठे शिल्प आहे.ही मूर्ती एकाच काळ्या दगडात बनविली आहे. भगवान बालाजीसाठी दरवर्षी उत्सव होत असतो.

देवळगांव हे महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यातील एक शहर आहे. देवळगांवमध्ये जुने बालाजी मंदिर आहे व ते महाराष्ट्राचे “तिरुपति” म्हणूनही ओळखली जाते. १६६५ मध्ये राजे जगदेवराव जाधव यांनी हे मंदिर बांधले आहे.

दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात ‘बालाजी महाराज यात्रा’ नावाचा एक स्थानिक उत्सव असतो. ‘लाथा मंडपोत्सव’ हे ह्या यात्रेचे प्रमुख आकर्षण आहे. भगवान बालाजींच्या मंदिरासमोर ४२ ‘मंडप २१ लाकडाचे खांबाच्या सहाय्याने उभे केले आहे. हे लाकूड खांब साग लाकडापासून बनविले आहेत. प्रत्येक स्तंभाची उंची 30 फुट आहे आणि व्यास 1.0 फूट आहे.

चिखली हे बुलढाणा जिल्ह्यातील एक गाव आहे. रेणुका देवी चिखलीची देवता आहे. रेणुका देवीचे मंदिर शहराच्या मध्यभागी आहे. मंदिर एक आश्चर्यकारक स्मारक आहे. चैत्र पोर्णिमा एक शुभ दिन आहे जेव्हा रेणुका देवी “यात्रा” आयोजित केली जाते. चिखली मध्ये, जुन्या शहरातील भगवान शिव मंदिर पाहण्याची आणखी एक जागा आहे. या ठिकाणाचा सर्वात उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे महाजनचे जुने लाकूड आणि खडकांमध्ये तयार केलेल्या 100 पेक्षा जास्त खोल्या असलेले एक मोठे घर आहे

श्री क्षेत्र बुधनेश्वर येथे पैनगंगा नदीचे उगमस्थान आहे. आख्यायिका नुसार पैनगंगा चे महात्म्य असे सांगण्यात आले आहे की पूर्वी एकेकाळी सह्याद्री पर्वतावर गंगाजलाने भरलेला ब्रह्मदेवाचा कमंडलू सांडला तेव्हा पासून हे स्थान कुंडीका तीर्थ या नावाने प्रसिद्ध आहे. येथे एक शिलामय गृह आहे.

बुलढाणा शहरामधील नांदुरा तालुक्यात 105 फूट उंचीची सर्वात मोठी भगवान हनुमानाची मूर्ती आहे.
शहरातील हे प्रमुख पर्यटन आकर्षण आहे भगवान हनुमानाची मूर्ती पांढऱ्या संगमरवरी खडकाची असून योग्य ठिकाणी वेगवेगळ्या रंगांचा वापर केला जातो.
भगवान हनुमानच्या हाताला गदा आहे आणि उजवा हात भाविकांना आशीर्वाद देत आहे.
हि मूर्ती राष्ट्रीय महामार्ग क्र. वर ६ आहे.