भुसुधार विभाग
विभागांतर्गत कामे
- भोगाधिकार मुल्य वसुलीबाबतची प्रकरणे हाताळणे व उ.वि.अ./तहसिलदार यांचेशी पत्र व्यवहार करणे.
- अतिरीक्त जमीन अदलाबदल (मोबदला) प्रकरणे हाताळणे.
- अतिरीक्त जमीन विक्रीची प्रकरणे हाताळणे.
- सिलींग प्रकरणातील मासीक अहवाल अ आणि ब इंगजी प्रपत्रात मा. आयुक्तांना सादर करणे.
- आदीवासींच्या जमीनीबाबत धारीका हाताळणे मासीक/त्रैमासीक विवरणे सादर करणे.
- अतिरीक्त जमीन संदर्भातील न्यायालयीन याचिकाबाबत कार्यवाही करणे.
- आदीवासी जमीन संदर्भात न्यायालयीन याचीकाबाबत कार्यवाही करणे.
- स्थाई आदेश नस्ती अदयावत ठेवणे.
- भूदान जमीनीबाबत धारीका हाताळणे.
- निकाली निघालेले संदर्भातील धारीका अभिलेख्यात जमा करणे.
- रोखे मुळ मालकांना उ.वि.अ/ तहसिलदार मार्फत वाटप करणे.
- सिलींग कायदयांतर्गत लेखाशिर्षामध्ये प्राप्त अनुदान सबंधित धारीका हाताळणे.
- सिलींग कायदयांतर्गत लेखाशिर्षामध्ये अंदाजपत्रक तयार करणे.
- सिलींग कायदयांतर्गत लेखाशिर्षामध्ये खर्चाचे ताळमेळ महालेखापाल नागपुर यांचे लेख्याशी मेळघेणे.
- महालेखापाल तसेच मा. आयुक्त यांचेकडील निरीक्षण टिपणींना पुर्ती अहवाल सादर करणे.
- अतिरीक्त जमीन वाटप प्रकरणाबाबत त्रैमासिक अहवाल मा. आयुक्तांना सादर करणे.
- मा.अपर जिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी (महसूल) यांनी नेमुन दिलेली कामे करणे.
- कुळ कायदयाच्या न्यायालयीन याचिकेमध्ये काम करणे.
- कुळ खरेदी वसुलीबाबत उ.वि.अ./तहसिलदार यांचेशी पत्र व्यवहार करणे.
- तहसिलदार स्तरावरील कुळ प्रकरणे निकाली काढण्याकरीता तहसिलदार यांचेकडे पाठपुरावा करणे.
- कुळ कायदा/सिलींग संदर्भात जिल्हाधिकारी यांचेकडे प्राप्त तक्रारीचा निपटारा करणे.
- कुळ व सिलींग जमीनी शर्तभंग प्रकरणात कार्यवाही करणे.
- नियतकालीन प्रकरणाची नोंदवही अदयावत ठेवणे.
- कुळ कायदयांतर्गत शासन, मा.आयुक्त यांचेकडील संदर्भ निकाली काढणे.
- निकाली निघालेले संदर्भातील धारीका आंग्लभाषा अभिलेख्यात जमा करणे.
- भूसुधार शाखेसबंधित माहितीचा अधिकार अधिनियमांतर्गत प्रकरणे/अपील प्रकरणे हाताळणे.