बंद

मानव विकास समिती

विभागाविषयी

महाराष्ट्र शासन, नियोजन विभाग, शासन निर्णय क्र. /ममावी-2010/ प्र.क्र.81/ का-1418 दि. 19/07/2011 अन्वये बुलढाणा जिल्हयातील 1. लोणार 2. सिंदखेड राजा 3. जळगाव जामोद 4. चिखली 5. देऊळगाव राजा 6. मेहकर 7. संग्रामपूर या 7 तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे.

तसेच महाराष्ट्र शासन, नियोजन विभाग, शासन निर्णय क्र. माविका- 2012/ प्र.क्र.69/ का. 1418 दि. 12 जुलै 2012 अन्वये बुलढाणा जिल्हयातील 1. लोणार 2. सिंदखेड राजा 3. जळगाव जामोद 4. देऊळगाव राजा 5. मेहकर या 5 क-वर्ग नगरपालिकांचा मानव विकास कार्यक्रमात समावेश करण्यात आलेला आहे.

विभागांतर्गत कामे

शिक्षण विषयक योजना
1 माध्यमिक/ उच्च माध्यमिक शाळांमध्ये अभ्यासिका सुरू करणे. मानव विकास कार्यक्रमांतर्गत सन 2011-12 पासून बुलढाणा जिल्हयामध्ये 7 तालुक्यात एकूण 163 अभ्यासिका कार्यरत आहेत. सन 2016-17 मध्ये ग्रामीण व नागरी भागासाठी एकूण रू.11.52 लक्ष निधी वितरीत करण्यात आला असून 5987 विद्यार्थ्यानी अभ्यासिकेचा लाभ घेतला आहे. सन 2017-18 मध्ये 27 जुन 2017 रोजी शाळा सुरू झाल्या असल्याने 1 जूलै 2017 पासून अभ्यासिका नियिमित सुरु करण्यात आल्या आहेत.
2 ग्रामीण भागातील सर्वच मुलींना इ.12 वी पर्यंत शिक्षण घेणे शक्य व्हावे याकरिता गाव ते शाळा यादरम्यान वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देणे. जिल्हयामध्ये 7 तालुक्यासाठी एकूण 49 बसेस गांव ते शाळा वाहतुक करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. सन 2016-17 मध्ये बसेसचा आवर्ती खर्च म्हणून प्रति बस रू.7.04/-लक्ष याप्रमाणे एकूण रू.344.96/-लक्ष निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. 31 मार्च 2017 अखेर सदर 49 बसेस मधून 6279 मुलींनी लाभ घेतला आहे. जून 2017 अखेर 2952 मुलींनी बसचा लाभ घेतला आहे.
3 तालुक्याच्या ठिकाणी बालभवन – विज्ञान केंद्र स्थापन करणे. सन 2012-13 मध्ये 7 तालुक्याच्या ठिकाणी 7 बालभवन विज्ञान केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. (प्रति बाल भवन रु. 10 लक्ष किंमत) भेटी देण्यात येणा-या विद्यार्थ्यांस 10 रूपये प्रमाणे निधी दिला जातो. ग्रामीण भागातील विदयार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाबाबत रूची निर्माण करणे या योजनेचा उद्देश आहे. सन 2016-17 मध्ये बालभवन आवर्ती खर्च व विद्यार्थी भेटीसाठी एकूण रू.2.45 लक्ष निधी वितरीत करण्यात आलेला आहे. 31 मार्च 2017 अखेर 15198 विद्यार्थ्यांनी भेटी दिल्या आहे. सन 2017-18 मध्ये 27 जून 2017 रोजी शाळा सुरू झाल्या असल्याने 1 जूलै 2017 पासून बालभवन भेटी नियमित सुरु करण्यात आल्या आहेत.
4 इयता 8 वी ते 12 पर्यंत शिक्षण घेत असलेल्या व शाळेपासून 5 कि.मी. अंतरापर्यंत राहणा-या गरजू मुलींना सायकल वाटप करणे. सन निर्णय, नियोजन विभाग दि.12 जुलै 2012 नूसार एकूण प्राप्त निधीच्या 10 टक्के रक्कम या योजनेवर खर्च करण्यात येते. प्रती मुलीस रूपये 3000/- प्रमाणे निधी बँक खात्यात जमा केला जातो. सन 2016-17 मध्ये निधी अभावी सायकल वाटप करता आले नाही.
आरोग्य विषयक योजना
1 तज्ज्ञ महिला डॉक्टरकडून गर्भवती महिलांची आरोग्य तपासणी करणे तसेच 0 ते 6 महिने वयोगटातील बालकांची व मातांची तपासणी करणे आणि औषधोपचार करणे. जिल्हयामध्ये मानव विकास कार्यकमांतर्गत 28 प्राथमिक आरोग्य केंद्रे व 5 ग्रामीण रूग्णालयांचा समावेश आहे. ग्रामीण भागात प्रत्येक महिन्यात 2 व नागरी भागात एक शिबीर घेण्यात येते. एका आरोग्य शिबीरासाठी रू.18,000/- इतका खर्च अनूज्ञेय आहे. शिबीरामध्ये लाभार्थींची तपासणी स्त्री रोग व बालरोग तज्ञामार्फत करण्यात येते. सन 2016-17 मध्ये रू.65.88/- लक्ष निधी वितरीत करण्यात आलेला आहे. माहे मार्च 2017 अखेर ग्रामीण भागात 322 आरोग्य शिबीरे व नागरी भागात 27 आरोग्य शिबीरे घेण्यात आली रू.61.57/- लक्ष खर्च झालेला आहे. सन 2017-18 मध्ये ग्रामीण भागासाठी रू.72.58/- लक्ष व नागरी भागासाठी रू.6.50/- लक्ष असा एकूण रू. 79.08/- लक्ष निधी वितरीत करण्यात आलेला आहे. माहे जून 2017 अखेर ग्रामीण भागात 80 आरोग्य शिबीरे व नागरी भागात 13 आरोग्य शिबीरे घेण्यात आली असा आतापर्यंत रू.16.59/- लक्ष खर्च झालेला आहे.
2 अ.जा./अ.ज./दारिद्रय रेषेखालील बाळंत महिलेला बुडीत मजुरी देणे. सदरचा लाभ लाभार्थी महिलेला प्रसुतीपूर्वी व प्रसुतीनंतर रू. 2000 अशाप्रकारे एकूण रू.4000/- देण्यात येतात. सदर निधी हा राष्ट्रीयकृत बँकेत किंवा पोस्ट ऑफीसमध्ये उघडलेल्या बचत खात्यात टाकला जातो. सन 2016-17 मध्ये 31 मार्च 2017 अखेर 7255 लाभार्थींना ग्रामीण भागासाठी रू.322.86/- लक्ष व 327 लाभार्थींना नागरी भागासाठी रू.19.20/- लक्ष बुडीत मजूरीचे वाटप करण्यात आले आहे. सन 2017-18 मध्ये गामीण भागासाठी रू 154.40/- व नागरी भागासाठी रू.14.20/- लक्ष प्रशासकीय मान्यता व निधी वितरीत करण्यात आला.
उत्पन्न वाढीच्या योजना
1 फिरती माती परिक्षण प्रयोग शाळा एका प्रयोगशाळेसाठी काचेचे सामान, रसायने,जनरेटर, वाहन खरेदीसाठी इ. करिता अंदाजे रू.35.00/- लक्ष या प्रमाणे 2 प्रयोगशाळांसाठी रू.70.00/- लक्ष निधी खर्च करण्यात आला आहे.सन 2016-17 मध्ये माहे 31 मार्च 2017 अखेर एकूण 6323 माती नमुने तपासण्यात आली आहे. सन 2017-18 मध्ये जून 2017 अखेर 1132 माती नमुने तपासण्यात आली.
जिल्हा/तालुका स्पेसिफिक योजना
1 प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये हॉस्पीटल कॉट पुरविणे सा 2015-16 मध्ये सदर योजने अंतर्गत बुलढाणा जिल्हयातील 7 तालुक्यात प्रती आरोग्य केंद्र 8 याप्रमाणे एकूण 224 हॉस्पीटल कॉट पुरविण्यात आले आहे. त्यासाठी प्रती कॉट रू.25000/- याप्रमाणे एकूण रू. 42.56/- लक्ष निधी खर्च करण्यात आला आहे.
2 प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रामध्ये स्टीलचे डिलेव्हरी टेबल पुरविणे सन 2015-16 मध्ये सदर योजने अंतर्गत बुलढाणा जिल्हयातील 7 तालुक्यात प्रती आरोग्य केंद्र 1 व उपकेंद्र 1 याप्रमाणे एकूण 100 स्टीलचे डिलेव्हरी टेबल पुरविण्यात आले आहेत. त्यासाठी प्रती स्टील डिलेव्हरी टेबल रू.25000/- याप्रमाणे एकूण रू. 19.61/- लक्ष निधी खर्च करण्यात आला आहे.
1.मानव विकास कार्यक्रमांतर्गत तालुक्यासाठी मिळणा-या एकूण निधीच्या 20 टक्के निधी जिल्हा/तालुका स्पेसिफिक योजनेवर खर्च करण्यात येतो. सदर योजनेचे मंजुरीसाठी प्रस्ताव मा.आयुक्त, मानव विकास आयुक्तालय, औरंगाबाद यांचेकडे सादर करण्यात येतात.
2.सा 2016-17 साठी मानव विकास कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणा-या योजानेसाठी रूपये 1104.83 लक्ष निधी शासनकडून उपलब्ध झाला असून त्यापैकी रूपये 1104.82 लक्ष निधी कार्यावयींण यंत्रणांना वितरीत करण्यात आलेला आहे. सर्व निधी यंत्रणांनी आहरित केला आहे.
3. सन 2017-18 चा रू.22.59 कोटीचा आराखडा मानव विकास आयुक्तालय औरंगाबाद येथे सादर केला आहे.
4.मानव विकास कार्यक्रम सन 2017-18 साठी सर्वसाधारण साठी रू.1192.24/- लक्ष व अनूसूचित जाती जमातीसाठी रू.23.73/- लक्ष असे एकूण रू.1215.97/- लक्ष निधी शासनाकडून प्राप्त झाला आहे. त्यापैकी आरोग्य शिबीरे आयोजित करणे यासाठी ग्रामीण भागासाठी रू.72.58/- लक्ष निधी जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प.बुलढाणा व नागरी भागासाठी रू.6.50/- लक्ष निधी जिल्हा शल्य चिकित्सक, बुलढाणा यांना वितरीत करण्यात आला आहे. बुडीत मजुरीसाठी ग्रामिण भागासाठी रू. 154.40/- लक्ष व नागरी भागासाठी रू.14.20/- लक्ष किंमतीची प्रशासकिय मान्यता देऊन निधी वितरीत करण्यात आला आहे