बंद

संजय गांधी योजना विभाग

पात्र लाभार्थी – सर्वसाधारणपणे समाजातील निराधार व्यकती म्हणजे ज्या व्यकती स्वत:चा उदरनिर्वाह करु शकत नाहीत.उदा.अपंग,अनाथ,दुर्धर रोग ग्रस्त्,विधवा स्त्रिया,एच.आय.व्ही ग्रस्त,अत्याचारीत महीला,वेश्याव्यवसायातून मुक्त केलेल्या महीला,35 वर्षावरील अविवाहीत महीला इ.लाभ देण्यात येतो

उत्पन्न मर्यादा – कुटूंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न रु.21000 /- किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे

आवश्यक कागदपत्रे – *वयाचा दाखला * रहीवासी दाखला * किमान 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी * दुर्धर आजाराबाबत जिल्हा शल्यचिकित्सक (सिव्हील सर्जन)/शासकीय रुग्णालयांच्या वैदयकीय अधीक्षकयांचा दाखला * उत्पन्नाचा दाखला/द्रारीद्रय रेषेखालील कुटूंबाच्या यादीमध्ये समावेश असल्याचा साक्षांकीत उतारा

शाखा/विभागा अंतर्गत करण्यात येणा-या कामाचा तपशिल –

आर्थीक सहाय्य् – समाजातील 65 वर्षे वयोगटाखालील वर नमूद केलेल्या प्रवर्गातील लाभार्थ्यास १५००  /- प्रति महीना अर्थसहाय्य 65 वर्षे वयोमर्यादेपर्यत देय आहे

संपर्क – अधिक माहीतीसाठी गावातील तलाठी तसेच तहसिल कार्यालयात सपंर्क साधावा

पात्र लाभार्थी – राज्यातील 65 व 65 वर्षावरील निराधार वृध्द व्यकतींना मासिक निवृत्तीवेतन देण्याच्या मूळ हेतूने श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन येाजना राबविण्यात येते

आवश्यक कागदपत्रे – *वयाचा दाखला * रहीवासी दाखला * उत्पन्नाचा दाखला

पात्रतेचे निकाष/अटी – 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहीवासी असणे आवश्यक. वय -65 व 65 वर्षापेक्षा अधिक,कुटूंबाचे नाव ग्रामीण / शहरी भागाच्या द्रारीद्रय रेषेखालील कुटूंबाच्या यादीत समाविष्ट असावे किंवा कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये 21000 /- पर्यत असावे

शाखा/विभागा अंतर्गत करण्यात येणा-या कामाचा तपशिल –

आर्थीक सहाय्य – राज्यातील 65 व 65 वर्षावरील द्रारीद्रयरेषेखालील कुटूंबाच्या यादीत नाव असलेल्या निराधार स्त्री व पुरषांना केंद्र शासनाच्या इंदीरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजनेमधून प्रतिमाह रुपये 200 /- निवृत्तीवेतन देण्यात येते.तसेच या योजनेस पुरक असलेल्या राज्य शासनाच्या श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेमधून प्रतिमाह रुपये १३००/- इतके निवृत्तीवेतन देण्यात येते म्हणजेच प्रतिमा १५०० इतके वेतन देय आहे.याला श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना गट अ म्हणतात
श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना गट ब ही योजना जे खरोखर गरजू निराधार वृध्द आहेत मात्र द्रारीद्रय रेषेखालील यादी मध्ये ज्यांची नोंद नाही व त्यांच्या कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये २१000 /- पर्यंत असेल तर अशा वृध्दांना संपूर्ण रुपये 600 /- इतके श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना गट ब मधून देय आहे

संपर्क – अधिक माहीतीसाठी गावातील तलाठी तसेच तहसिल कार्यालयात सपंर्क साधावा

पात्र लाभार्थी – केंद्र शासनाने विहीत केलेल्या निकषांनुसार राज्यातील द्रारीद्रय रेषेखालील नोंद असलेले 65 व 65 वर्षावरील निराधार वृध्द व्यकती या योजनेमध्ये पात्र राहतील

उत्पन्नाचा दाखला – द्रारीद्रय रेषेखालील कुटूंबाच्या यादीमध्ये त्या व्यकती / कुटूंबाचा समावेश असल्या बददलचा साक्षांकीत उतारा

शाखा/विभागा अंतर्गत करण्यात येणा-या कामाचा तपशिल –

आर्थीक सहाय्य – द्रारीद्रय रेषेखालील कुटूंबाच्या यादीत नाव असलेल्या 65 व 65 वर्षावरील निराधार वृध्द व्यकती पात्र होतील
केंद्र शासनाकडून रुपये 200/- प्रतिमाह प्रति लाभार्थी निवृत्तीवेतन इंदीरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजनेमधून देण्यात येईल
तसेच राज्य शासनाच्या श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेमधून प्रतिमाह रुपये 1300 /- इतके निवृत्तीवेतन देण्यात येते.
यामुळे लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून रुपये 200 /- व राज्य शासनाकडून रुपये 1300 /- असे एकुण रुपये 1500 /- प्रतिमाह प्रतिलाभार्थी निवृत्तीवेतन मिळेल

संपर्क – अधिक माहीतीसाठी गावातील तलाठी तसेच तहसिल कार्यालयात सपंर्क साधावा

पात्र लाभार्थी – केंद्र शासनाने विहीत केलेल्या निकषांनुसार राज्यातील 18 ते 65 वर्षाखालील द्रारीद्रय रेषेखालील यादीत नोंद असलेल्या व 80 % अपंगत्व असलेल्या अपंग व्यकती या योजनेस पात्र राहतील
वय – 18 ते 65 वर्षाखालील तसेच 80% अपंगत्व असलेल्या अपंग स्त्री / पुरुष कुटूंबाचे नाव ग्रामीण / शहरी भागाच्या द्रारीद्रय रेषेखालील कुटूंबाच्या यादीत नाव समाविष्ट असावे

आवश्यक कागदपत्रे – * वयाचा दाखला * द्रारीद्रय रेषेखालील कुटूंबाच्या यादीमध्ये समावेश असल्याचा साक्षांकीत उतारा. * रहीवासी दाखला * जिल्हा शल्यचिकीत्सक (civil serjon) चे अपंगत्वाचे प्रमाणपत्र

शाखा/विभागा अंतर्गत करण्यात येणा-या कामाचा तपशिल –

आर्थिक सहाय्य – लाभार्थ्यास या योजनेतून केंद्र शासनाकडून रुपये 300 /- प्रतिमाह + राज्य शासनाकडून रुपये 1200 /- असे एकुण रुपये 1500 /- निवृत्तीवेतन दरमहा देण्यात येते

संपर्क – अधिक माहीतीसाठी गावातील तलाठी तसेच तहसिल कार्यालयात सपंर्क साधावा

पात्र लाभार्थी – केंद शासनाने विहीत केलेल्या निकषानुसार राज्यातील दारीद्रय रेषेखालील नोंद असलेली 40 ते 65 वर्षाखालील विधवा स्त्रिया आहे. विधवा महिलांचे कुटूंबाचे नांव ग्रामीण/शहरी भागाच्या दारीद्रय रेषखालील कुटूंबाच्या यादीत नाव समाविष्ट असावे

आर्थिक सहाय्य – लाभार्थ्यास या योजनेतून केंद्र शासनाकडून रु.300/- प्रतिमाह + राज्य शासनाकडून रु.1200/- असे एकुण 1500/- रु. निवृत्ती वेतन दरमहा देण्यात येते

आवश्यक कागदपत्रे – * वयाचा दाखला * दारीद्रय रेषेखालील कुटूंबाच्या यादीमध्ये समावेश असल्याबददलचा साक्षांकीत उतारा * रहीवासी दाखला * पतीच्या मुत्यूचा दाखला

संपर्क – अधिक माहीतीसाठी गावातील तलाठी तसेच तहसिल कार्यालयात सपंर्क साधावा

पात्र लाभार्थी – द्रारीद्रय रेषेखालील कुटूंबातील 18 ते 64 वयोगटातील कोणत्याही कमावत्या व्यकतीचा मुत्यू झाल्यास मृताचे कुटूंब / वारस पात्र लाभार्थी आहे.कुटूंबाचे नाव ग्रामीण / शहरी भागाच्या द्रारीद्रय रेषेखालील कुटूंबाच्या यादीत नाव समाविष्ट असावे

आवश्यक कागदपत्रे – * कुटूंबाचे नाव ग्रामीण / शहरी भागाच्या द्रारीद्रय रेषेखालील कुटूंबाच्या यादीत समाविष्ट असल्याचा पुरावा * रहीवासी दाखला • कर्त्या व्यकतीचा (स्त्री / पुरुष) मुत्यूचे प्रमाणपत्र

शाखा/विभागा अंतर्गत करण्यात येणा-या कामाचा तपशिल –

आर्थिक सहाय्य – कुटूंबातील कर्त्या व्यकतीचा (स्त्री / पुरुष) मुत्यू झाल्यांनतर कुटूंबास / वारसाला रुपये 20000 /- एकरकमी अर्थसहाय्य देण्यात येते

संपर्क – अधिक माहीतीसाठी गावातील तलाठी तसेच तहसिल कार्यालयात सपंर्क साधावा