बंद

विधी विभाग

विभागांतर्गत कामे

शासन निर्णय दिनांक 30 जुलै 2011 आणि शासन निर्णय दिनांक 13 नोंव्हेबर 2013 नुसार सवर् न्यायालयीन बाबींच्या अनुषंगाने कार्यवाही करणे तसेच संबंधित शासन निर्णयाची अंमलबजावणी करणे.

कार्यालयात प्राप्त होणाऱ्या सर्व प्रकारच्या कायदेविषयक बाबींबाबत/न्यायालयीन प्रकरणी सल्ला देणे व न्यायालयीन प्रकरणे हाताळणे.

महसुल विषयक/परिच्छेद निहाय अभिप्राय तयार करणे/सेवाविषयक/प्रशासकीय बाबी/विभागीय चौकशी इ. समकालीन कायदयाची प्रस्थापित स्थिती बाबत सर्व प्रकरणी सल्ला देणे व ती प्रकरणे हाताळणे. शपथपत्राचा मसुदा तयार करणे व त्यास सक्षम प्राधिकाऱ्याची मान्यता घेऊन न्यायालयात विहित मुदतीत सादर होईल हे पाहणे.

जेथे शासनाच्या विरोधात /न्यायालयीन निकाल दिलेला आहे अशा प्रकरणामध्ये न्यायालयाच्या निर्णयाचा अभ्यास करुन तदनुषंगाने अपील दाखल करण्याच्या संदर्भात उचित कार्यवाही करणे.