बंद

आपत्ती व्यवस्थापन

विभागांतर्गत कामे

  1. जिल्हाधिकारी कार्यालयातील नैसर्गीक आपत्ती नियंत्रण कक्ष ३६५ दिवस २४ तास कार्यन्वीत ठेवण्यात येतो
  2. नैसर्गीक आपत्ती नियंत्रण कक्षात जिल्हयाच्या ठिकाणी असलेले कार्यालयाचे कर्मचाऱ्यांची नियुक्ती दर सहा महिन्यानी करण्यात येते
  3. तालुका स्तरावरील नियंत्रण कक्षावर नियंत्रण ठेऊन आपत्ती विषयक माहिती घेणे
  4. आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करणे व त्याचे अद्यावतीकरण, विचार विनीमय कार्यशाळांचे आयोजन करणे, आराखडयांची व्यवहार्यता तपासणे, रंगीत तालीम घेणे आपत्ती व्यवस्थापना संबधी तहसिलचे तसेच इतर विभागाचे आराखडे तयार करणे
  5. यात्रा व्यवस्थापन आराखडा तयार करणे
  6. संस्थात्मक मजबूती करणे – जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे मजबूतीकरण व पूर्वतयारी संबधात शासकीय संस्थाचे बोट क्लब, HAM गट इत्यादी संस्थाची सज्जता आपत्ती व्यवस्थापनाशी निगडीत अशासकीय संस्थाचे प्रशिक्षण, सामाजिककार्य, महाविद्यालय, इस्पितळांची सज्जता, जिल्हा आपतकालीन कार्य केंद्रांची सज्जता
  7. प्रशिक्षण व सक्षमिकरण – प्रशासन, अभियंते, वास्तुविशारद, डॉक्टर्स, विद्यार्थी व शिक्षक, प्रसार माध्यमे, उद्योग जगत, यांचे प्रशिक्षण व सक्षमिकरण
  8. जनजागृती कार्यक्रम – आपत्ती व्यवस्थापन विक्षयक चित्रफिती , रेडीओ जिंगल्स, रोड शो, लोकगीते, पथनाटय, भिंती पत्रक, पोष्टर्स, निबंध स्पर्धा जिहीराती फलक इत्यादी मधुन जनजागृती करणे
  9. आपत्ती व्यवस्थापना संबधी माहीती पुस्तीका तयार करणे, मार्गदर्शक तत्वे, प्रमाणीत कार्यपध्दती तयार करणे
  10. तालुका स्तरावर व जिल्हास्तरावर शोध व बचाव पथक तयार करणे
  11. पूर परिस्थितीत उपयोगात आणावयाची सामुग्रीची वेळोवेळी तपासणी व देखभाल करणे
  12. ग्रामपातळीवर पूरनियंत्रण समित्यांची स्थापना करणे
  13. अतिवृष्टी / वादळ / गारपीट / उन्हाळयामधील वाढते तापमान या बाबत वेधशाळेकडून आलेल्या इशाऱ्याची माहिती जिल्हयातील तालुक्यांना देणे
  14. उष्ण लहरी / उष्माघाता बाबत जिल्हा आरोग्य यंत्रणेशी समन्वय ठेवणे
  15. पुर / आग / वादळ अशा प्रकारच्या इतरही आपत्ती मध्ये मदत देणे