बंद

खनिकर्म विभाग

विभागांतर्गत कामे

अ.क्र. तपशिल कामाचे स्वरुप
1 नियम व आदेश 1) शासन निर्णय क्रमांक गौखनि -10/ 512/प्र.क्र.300/ख, दिनांक 12 मार्च, 2013
2) महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन (विकास व विनियमन) नियम, 2013
2 वाळु /रेती निर्गती सुधारित धोरण महाराष्ट्र शासनाने, शासन निर्णय क्रमांक गौखनि -10/ 512/प्र.क्र.300/ख, दिनांक 12 मार्च, 2013 नुसार वाळु/ रेती निर्गतीचे सुधारित धोरण तयार केले आहे. त्यानुसार वाळु गटांची निर्गती संबंधी खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात येते.
1) जिल्ह्यातील नदी/ नाल्यातील वाळुचे गट पाडुन त्यांचे भौगोलिक स्थान, वाळु/ रेतीचा अंदाजे साठा, उपलब्ध पोचमार्ग इ. माहिती तहसिलदार यांचेकडुन प्राप्त करुन घेतली जाते.
2) सदर वाळु गटांमधुन वाळु उत्खननासाठी संबंधित ग्रामपंचायतीकडुन ग्रामसभेची नाहरकत मागविण्यात येते.
3) तहसिलदारांनी प्रस्तावित केलेल्या वाळु गटांचे माहे एप्रिल व मे महिन्यात जिल्हा खनिकर्म अधिकारी, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा आणि संबंधित तहसिलदार याचे मार्फत सर्वेक्षण करण्यात येते तसेच अंतिम सर्वेक्षण सप्टेंबर महिन्यात करण्यात येते.
4) सर्वेक्षणानंतर भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा यांनी प्रस्तावित रेतीघाटांपैकी ज्या रेतीघाटांस योग्य प्रमाणपत्र सादर केले अशा रेतीघाटांचा लिलाव करण्याकरिता पर्यावरण विभागाची मान्यता घेण्यात येते. तदनंतर सदरहु रेतीघाटांची हातची किंमत (ऑफसेट प्राईजची) निश्चित करुन प्रस्ताव मा.विभागीय आयुक्तांकडे मान्यतेकरिता सादर करण्यात येतो.
5) मा.विभागीय आयुक्तांनी रेतीघाटांचे हातची किंमतीस (ऑफसेट प्राईजला) मान्यता प्रदान केल्यानंतर सदर वाळू/ रेतीची निर्गती करण्याकरिता ई निविदा व ई लिलाव पध्दतीने लिलाव करण्यात येतो.
6) ऑफसेट प्राईजपेक्षा सर्वोच्च बोली असलेल्या लिलाव धारकास वाळू गटांची मंजुरी देऊन संपुर्ण रक्कम शासन जमा केल्यानंतर करारनामा निष्पादित करण्यात येतो व लिलावाचा दिनांक काहीही असता तरी वाळू गटांमधुन वाळु उत्खननाचा कालावधी 30 सप्टेंबर पर्यंतच देण्यात येतो.
7) SMATS प्रणालीद्वारे वाळु गटांची नोंद घेवुन वाळु उत्खननाबाबत माहिती उपलब्ध करुन देण्यात येते. तसेच www. mahamining. com सॉफ्टवेअर वापरणे बंधनकारक करण्यात येते.
3 महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन (विकास व विनियमन) नियम, 2013 खाण व खनिज (विकास व नियमन) अधिनियम, 1957 चे केंद्र शासनाच्या अधिनियमातील कलम 15 नुसार प्रदान करण्यात आलेल्या आणि याबाबतीत त्यास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकाराचा वापर करुन महाराष्ट्र शासनास गौण खनिज उत्खननाचे विनियमन करण्याकरिता नियम तयार करणेचे अधिकार आहेत. त्यानुसार महाराष्ट्र शासनाने, महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन (विकास व विनियमन) नियम, 2013 तयार केले असुन, सदर नियम दिनांक 24/10/2013 पासून अंमलात आला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा येथील खनिकर्म शाखेत प्रामुख्याने महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन (विकास व विनियमन) नियम, 2013 मधील निर्देशानुसार गौण खनिजाचा खनिपट्टा/ स्टोन क्रशर परवाने देणे, गौण खनिजाचा खनिपट्टा/ स्टोन क्रशर परवान्यांचे नुतणीकरण या संबंधिताचे अर्ज स्विकारण्याची आणि मंजुरीबाबत कार्यवाही करण्यात येते. जिल्हा खाणकाम आराखडा तयार करणे, त्यानुसार गौण खनिजाचे तात्पुरते परवाने देण्याबाबत अधिनस्त कार्यालयांना मार्गदर्शन करण्यात येते.
4 खनिपट्टा मंजूरी व लेखा नस्ती :-  खनिपट्टा अर्ज, खनिपट्टा मंजूरी, नूतनीकरण नस्ती, खनिपट्टा रद्द प्रकरणाच्या नस्त्या, करारपत्र, तात्पुरता परवाने इत्यादीसंबधीच्या सर्व नस्त्या, खनिपटट्याची यादीनुसार सर्व आदेश व लेखा नस्त्या. वार्षिक अहवाल, त्रैमासिक अहवाल, मासिक अहवाल
5 न्यायालयीन प्रकरणे  मा. सर्वोच्च, उच्च न्यायालय, व न्यायालयातील सर्व प्रकरणे, पत्रव्यहार व अनुषंगीक सर्व प्रकरच्या कामकाज व नस्त्या हाताळणे.
6 समित्या अवेध खनिज उत्खनन व वाहतूक समिती नस्ती,
भरारी पथक समिती नस्ती,
जिल्हा खाणकाम योजना समिती नस्ती
जिल्हा पर्यावरण समिती नस्ती
7 इतर तक्रारी व लोकशाही दिन तक्रारी संबधीच्या सर्व नस्त्या व सर्व कामकाज.
राजस्व अधिकारी सभा, व इतर सभेची टिपणी,
माहितीचा अधिकारी अधिनियम 2005 नुसार सर्व कामकाजच्या नस्त्या. माहितीच्या अधिकारी संबधिचे सर्व कामकाज.
राजस्व अभियानची नस्ती,
कुंभार नस्ती.
तारांकित प्रश्न, अतारांकित प्रश्न, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधानपरिषद प्रश्न, लक्षवेधी सूचना, इत्यादीच्या नस्ती,
मा. मुख्यम्ंत्री, मा. मंत्री, खासदार, आमदार यासंबधीच्या नस्त्या व शासनाकडील पत्रव्यहार.
8 नोंदवही खनिपट्टा अर्ज, मंजूरी, नुतनीकरण नोंदवही, खनिपट्टयाची खतावणी, तात्पुरता परवाना अर्ज, मंजूरी नोंदवही, अवैध गौण खनिज उत्खनन नोंदवही, माहितीच्या अधिकार नोंदवही, पी. आर ए व पी. आर. बी नोदवही, प्रलंबीत प्रकरणांची नोंदवही, खनिज प्रशासनाबाबत नोंदवही, चलान नोंदवही,अवैध नोंदवही.
9 लेखाविभाग महालेखापाल नागपूर यांच्या कार्यालयातील महसुल जमा व खर्चाच्या ताळमेळ. ताळमेळ नस्ती. मासिक विवरण, कोषागारातील आकडेवारीचा ताळमेळ, त्रैमासिक ताळमेळाची नस्ती.